पॅन आधार लिंक - अंतिम मुदत संपण्यापूर्वी पॅन कार्डसोबत आधार क्रमांक लिंक कसा करावा?

Updated on: Jun 26th, 2023

|

19 min read

social iconssocial iconssocial iconssocial icons

पॅन आणि आधार लिंकची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. १ जुलै २०२३ पासून पॅन जर आधारशी लिंक नसेल निष्क्रिय होईल. 

पॅन कार्ड असलेल्या सर्व नागरिकांनी ३० जून २०२३ पर्यंत आधार कार्डशी लिंक करावे.सरकारने प्रत्येक करदात्यांना मुदत संपण्यापूर्वी पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.पॅन-आधार लिंक करण्याची विनंती करण्यापूर्वी १,००० रुपयांचा दंड भरावा लागेल.30 जून 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक केले नाही तर १ जुलै २०२३3 पासून पण कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असल्याची  खात्री करा.

आधार कार्ड मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) भारतातील प्रत्येक नागरिकाला दिलेला १२ अंकी क्रमांक असतो.हा एक ओळख क्रमांक आहे जो सरकारी डेटाबेसमधून कार्डधारकाचा तपशील देण्यास मदत करतो, जसे की बायोमेट्रिक आणि संपर्क विषयक माहिती उपलब्ध करुन देतो. 

कोणतीही व्यक्ती, वय आणि लिंग काहीही असो, भारतीय नागरिक म्हणून, स्वेच्छेने आधार क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करता येतो.प्रवेश प्रक्रिया विनामूल्य आहे.एखाद्या व्यक्तीची नोंद झाल्यानंतर, त्यांचे तपशील डेटाबेसमध्ये कायमस्वरूपी साठवले जातात. एका व्यक्तीकडे अनेक आधार क्रमांक असू शकत नाहीत.

तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे तपासाल?

पॅन-आधार लिंकची तारीख ३१ मार्च २०२२ पासून ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.मात्र दंड न भरता पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचा शेवटचा दिवस ३१ मार्च २०२२ होता.आता आधार लिंक करण्यासाठी 1,000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

जर तुम्ही पॅन-आधार लिंक न करता आयकर विवरणपत्र भरले असेल तर , जोपर्यंत पॅन-आधार लिंक होत नाही तोपर्यंत आयकर विभाग विवरणपत्र प्रक्रिया सुरु करणार नाही.दोन प्रकरणांमध्ये दोन ओळख पत्रके लिंक करण्यासाठी लोक अधिकृत आयकर ई-फायलिंग संकेतस्थळाला भेट देऊ शकतात- दोन डेटाबेसमधील एकसारखी नावे किंवा थोडेसे जुळत नसलेल्या बाबतीत.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले आहे की नाही याची खात्री नसल्यास, तुम्ही हे खात्री करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करू शकता :

१. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर भेट द्या. होमपेजवर जलद लिंक अंतर्गत ‘लिंक आधार स्टेटस’ वर क्लिक  करा.

२.  आपला पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि ‘व्ह्यूव लिंक आधार स्टेटस’ वर क्लिक करा.

आता जर तुमचं पॅन आणि आधार लिंक नसेल तर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे पॉपअप दिसेल. त्यांना लिंक करण्यासाठी, आपण या चरणांचे अनुसरण करू शकता. आणि जर त्या आधीच लिंक  गेल्या असतील तर क्लिअरटॅक्स वर आयकर भरण्यास पुढे जाऊ शकता.

 

पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक कराल?

तुमचे आधार तुमच्या पॅन कार्डशी लिंक करण्याचे दोन महत्त्वाचे टप्पे: 

I. एवाय २०२३-२४ साठी NSDL पोर्टलवर मेजर हेड (००२१) आणि मायनर हेड (५००) अंतर्गत फी भरणे.

II. आधार-पॅन लिंक विनंती सबमिट करा.

कागदपत्रे तयार ठेवा : 

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक 

I. NSDL पोर्टलवर फी भरणे

पायरी 1: आयकर भरण्याच्या पृष्ठावर जा आणि नॉन -टीडीएस/टीसीएस श्रेणी अंतर्गत चलन क्रमांक/आयटीएनएस २८० निवडा.

पायरी 2: पुढील स्क्रीनवर हेड (००२१) आणि नंतर ‘(५००)’ निवडा.

पायरी 3: पेमेंटची पद्धत निवडण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करा (जसे की तुमचा पॅन, मूल्यांकन वर्षासाठी 2023-24 निवडा, पत्ता इ.)

पायरी 5: पेमेंट करण्यासाठी पुढे जा आणि पॅन-आधार लिंक विनंती सबमिट करण्यासाठी पुढील चरणांचे अनुसरण करा. अर्ज भरण्यापूर्वी ४-५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

ii. आधार क्रमांक आणि पॅन लिंक करण्यासाठी ऑनलाईन/ऑफलाइन अर्ज सादर करा

आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करू शकता.एसएमएसद्वारेही तुम्ही हे करू शकता. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे तीन मार्ग आहेत: 

१. एसएमएसद्वारे आधार क्रमांक आणि पॅन कार्ड लिंक करणे

२. आपल्या खात्यात लॉग इन न करता (२-चरण प्रक्रिया)

३. तुमच्या खात्यात लॉग इन करणे (6-चरण प्रक्रिया)

पद्धत १ : आधार क्रमांक आणि पॅन कार्ड एसएमएसच्या माध्यमातून लिंक करणे 

आता तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.आयकर विभागाने करदात्यांना एसएमएसद्वारे त्यांच्या पॅन कार्डशी आधार लिंक करण्याचे आवाहन केले आहे.यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवून हे केले जाऊ शकते.आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ५६७६७८ किंवा ५६१६१  या क्रमांकावर खालील फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवावा.

युआयडीपॅन <जागा><१२ अंकी आधार>जागा><१० अंकी पॅन>

उदाहरण: UIDPAN 123456789123 AKPLM2124M

पद्धत 2: आपल्या खात्यात प्रवेश न करता (२-चरण प्रक्रिया)

पायरी 1: आयकर  ई फायलिंग पोर्टलवर जा. क्विक लिंक्स अंतर्गत, ‘लिंक आधार’ टॅबवर क्लिक करा.

पायरी 2: आधार आणि पॅन कार्ड नंबर प्रविष्ट करा

पायरी 3: लक्षात घ्या की जर पॅन दुसर्‍या आधारशी लिंक केला असेल, तर तुम्हाला एक एरर दिसेल ज्यामध्ये 'पॅन आधीच दुसर्‍या आधारशी लिंक आहे' असे लिहिलेले आहे.

या प्रकरणात, तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्डला दुसऱ्या आधार कार्डशी लिंक केले असेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता किंवा ई-फायलिंग हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता.

तुम्ही पॅन आणि आधार कार्डला प्रमाणित केल्यानंतर 3 परिस्थिती असू  शकतात:

परिस्थिती 1: तुम्ही एनएसडीएल (आता प्रोटीन्स ) पोर्टलवर चलनाचे पेमेंट केले असल्यास आणि  ई-फायलिंग पोर्टलवर पेमेंट तपशील पडताळणी करता येईल.

पायरी 1: पॅन आणि आधारची वैधता तपासल्यानंतर, तुम्हाला एक पॉप-अप संदेश दिसेल “तुमचे पेमेंट तपशील पडताळून पाहिले आहेत”. ‘आधार लिंक’ विनंती सबमिट करण्यासाठी ‘कंटिन्यु’ बटणावर क्लिक करा.

पायरी 2: आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि  ‘आधार लिंक करा’ बटणावर क्लिक करा.

पायरी 3: आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला 6 अंकी ओटीपी टाका आणि वैध करा.

तुमच्या विनंतीवरून स्क्रीनवर एक यशस्वी संदेश दिसेल. आता तुम्ही आधार-पॅन लिंकचा स्टेटस तपासू शकता.

परिस्थिती 2: पेमेंटची माहिती ई-फायलिंग पोर्टलवर पडताळली नसल्यास.

पॅन आणि आधारची वैधता तपासल्यानंतर तुम्हाला "पेमेंट तपशील आढळले नाहीत" असा पॉप-अप संदेश दिसेल.पेमेंट अयशस्वी झाल्यास, तर प्रथम एनएसडीएल पोर्टलवर पेमेंट पूर्ण करावे लागेल, आधी दाखवल्याप्रमाणे, कारण पॅन-आधार लिंक विनंती सबमिट करण्यासाठी ही  पूर्व अट आहे. मात्र जर तुम्ही एनएसडीएल पोर्टलवर शुल्क भरले असेल तर तुम्ही ही लिंक ४-५ कामकाजाच्या दिवसानंतर सबमिट करू शकता.

परिस्थिती 3: पॅन आणि किरकोळ हेड कोड ५०० चा रेकॉर्ड असेल, परंतु लिंकसाठी आधीच चलान वापरले जाते.

तुमच्या पॅन आणि आधारची वैधता तपासल्यानंतर तुम्हाला एक पॉप-अप संदेश दिसेल “या पॅन कार्डसाठी पूर्वी केलेले पेमेंट आता आधार-पॅन लिंक करण्यासाठी वापरले जात आहे”.

तुम्हाला एनएसडीएलवर पुन्हा फी भरावी लागेल आणि ४-५ कामकाजाच्या दिवसांनंतर आधार-पॅन लिंकिंग विनंती सबमिट करावी लागेल.

पद्धत 3: तुमच्या खात्यात लॉग इन करणे (6-चरण प्रक्रिया)

पायरी 1: जर आपली नोंदणी नसेल तर आपण इनकम टॅक्स ई फायलिंग पोर्टलवर नोंदणी करू शकता.

पायरी 2 - युजर आयडी टाकून आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

 

पायरी 3: सुरक्षित प्रवेश संदेश निश्चित करा आणि पासवर्ड टाका. आणि पुढे जाण्यासाठी ‘कंटिन्यू’ वर क्लिक करा. 

 

पायरी 4 - वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. वैकल्पिकरित्या, “माय प्रोफाइल” वर जा आणि “पर्सनल डिटेल्स ” अंतर्गत ‘लिंक आधार’ निवडा.

पायरी 5: ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी करताना सबमिट केलेल्या तपशीलांनुसार नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारखे तपशील टाका. तुमचा आधार क्रमांक आणि आधार कार्डनुसार नाव टाका.तुमच्या आधार कार्डवर नमूद केलेली माहिती स्क्रीनवरील माहितीशी  पडताळून पहा. 

 

‘मी माझा आधार तपशील प्रमाणित करण्यास सहमत आहे’ चेक बॉक्सची निवड करून तुम्हाला तुमची संमती देणे अनिवार्य आहे.

 

जर तुमच्या आधार कार्डमध्ये फक्त जन्म वर्षाचा उल्लेख असेल, तर ‘माझ्याकडे आधार कार्डमध्ये फक्त जन्म वर्ष आहे’ माहिती देणाऱ्या चेक बॉक्सची निवड करा.

 

‘लिंक आधार’ वर क्लिक करा.

 

पायरी 6: तुमचा आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडलेला आहे, याची माहिती तुम्हाला पॉप अप संदेशद्वारे मिळेल.

 

एरर मेसेजचे निराकरण कशे करायचे ? 

 

EF30032 एररचे निराकरण कशे करायचे  "पॅन  आधीच ईआरआय साठी क्लायंट आहे"?

EF500096 एररचे निराकरण कशे करायचे "हा पॅन आधीपासूनच आजपर्यंत क्लायंट आहे"?

 

करदात्यांच्या वतीने कर परतावा दाखल करण्यासाठी अधिकृत असलेली एआरआय (ई-रिटर्न इंटरमीडियरी) ही एक वैयक्तिक संस्था आहे.करदाता अनेक ERI साठी ग्राहक असू शकत नाही.आपला पॅन आधीच ERI साठी क्लायंट असतो(जसे क्लिअरटॅक्स), तर पॅन-आधार लिंक करताना हा एरर दिसून येईल.

 

आपण खालील चरणांचे पालन करून मागील ई-रिटर्न इन्टर्मीडीएरी निष्क्रिय करू शकता:

 

पायरी 1: ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा आणि खाली दिलेल्या ड्रॉप डाऊनमधून ई-टर्न इन्टर्मीडीएरी निवडा.

 

पायरी 2: डिऍक्टिव्हेट वर क्लिक करा

 

 

पायरी 3: निवडलेला ERI यशस्वीरित्या निष्क्रिय केला जाईल. तुमचा पूर्वीचा ERI यशस्वीरित्या निष्क्रिय केल्यानंतर, तुम्ही तुमचा ERI म्हणून क्लिअरटॅक्स  जोडू शकता आणि तुमच्या ITR फाइलिंगसह पुढे जाऊ शकता.

 

 

EF500058 एररचे निराकरण कशे करायचे  "या ERI साठी पॅन वैध क्लायंट नाही"?

 

पॅन क्लायंट म्हणून नोंदणी करतेवेळी तुम्हाला हे एरर आढळल्यास, याचा अर्थ असा आहे:

  • क्लिअरटॅक्स चा ERI ID तुमच्या आयकर खात्यात निष्क्रिय केला आहे किंवा
  • तुमचा पॅन दुसर्‍या ERI चा क्लायंट म्हणून जोडलेला आहे.

एरर कशे  दुरुस्त करायचे?

पायरी 1: तुमच्या आयकर खात्यात लॉग इन करा.अधिकृत भागीदार >>माय ई-रिटर्न इन्टर्मीडीएरीवर क्लिक करा.खालील प्रमाणे तुम्ही 'ॲक्टिव्ह' आणि 'इनॲक्टिव्ह' असे दोन टॅब पाहू शकता:

पायरी २:

  • क्लिअरटॅक्स ERI ERIP000708 आहे . ॲक्टिव्ह टॅब अंतर्गत इतर कुठलेही ERI आढळल्यास, त्याला इनॲक्टिव्ह करा.
  • इनॲक्टिव्ह टॅबमध्ये क्लिअरटॅक्स ERI आढळल्यास, ‘ॲक्टिव्हेट’ वर क्लिक करा.

ॲक्टिव्ह टॅबमध्ये एकदा क्लिअरटॅक्स ERI आढळल्यास, तुम्ही क्लिअरटॅक्सवरील रिटर्न फाइल करून पुढे जाऊ शकता.क्लिअरटॅक्स ERI ॲक्टिव्ह टॅबमध्ये दिसत नसल्यास, तुम्ही क्लिअरटॅक्स वर OTP द्वारे प्रमाणीकृत करून तुमचा पॅन नोंदणी करणे आवश्यक आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न

पॅन-आधार लिंकसाठी प्रयत्न करताना मला एक संदेश मिळाला की प्रमाणीकरण अपयशी झाले आहे. मी काय करावे?

आधार आणि पॅन मधील डाटा जुळत नसल्यामुळे त्याची ओळख पटवणे अपयशी ठरते.नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक यासारख्या डेटाची अचूकता तुम्ही तपासू शकता.

जर जन्मतारीख किंवा नावात विसंगती असेल तर मी पॅन आणि आधार कसे लिंक करू?

आधार लिंक प्रक्रिया सुरू करण्यासाठी, तुमच्या आधार कार्डनुसार तुमचा पॅन आणि आधार क्रमांक, तुमचे नाव, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल; लिंक सक्षम करण्यासाठी आयकर विभाग नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवेल.जन्म तारखेशी जुळत नसेल तर आधार कार्डची माहिती अपडेट करावी लागेल.

माझा पॅन आणि आधार लिंक नसेल तर मी माझा आयटीआर फाईल करू शकतो का?

आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल.आधार नंबर नसेल तर आधार नोंदणी क्रमांक द्यावा लागेल.

अनिवासी भारतीयांना पॅन आणि आधार लिंक करण्याची गरज आहे का?

केवळ भारतीय रहिवाशीयांना आधार क्रमांक मिळू शकतो.आधार अर्जाच्या तारखेच्या लगेच आधी ज्या व्यक्तीचा भारतात १८२ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा मुक्काम आहे ती रहिवासी आहे.एनआरआय व्यक्तींना आधार कार्डशी लिंक करण्याची गरज नाही.

सामग्री सारणी

Clear offers taxation & financial solutions to individuals, businesses, organizations & chartered accountants in India. Clear serves 1.5+ Million happy customers, 20000+ CAs & tax experts & 10000+ businesses across India.

Efiling Income Tax Returns(ITR) is made easy with Clear platform. Just upload your form 16, claim your deductions and get your acknowledgment number online. You can efile income tax return on your income from salary, house property, capital gains, business & profession and income from other sources. Further you can also file TDS returns, generate Form-16, use our Tax Calculator software, claim HRA, check refund status and generate rent receipts for Income Tax Filing.

CAs, experts and businesses can get GST ready with Clear GST software & certification course. Our GST Software helps CAs, tax experts & business to manage returns & invoices in an easy manner. Our Goods & Services Tax course includes tutorial videos, guides and expert assistance to help you in mastering Goods and Services Tax. Clear can also help you in getting your business registered for Goods & Services Tax Law.

Save taxes with Clear by investing in tax saving mutual funds (ELSS) online. Our experts suggest the best funds and you can get high returns by investing directly or through SIP. Download Black by ClearTax App to file returns from your mobile phone.

Cleartax is a product by Defmacro Software Pvt. Ltd.

Company PolicyTerms of use

ISO

ISO 27001

Data Center

SSL

SSL Certified Site

128-bit encryption